भविष्यात महाविकास आघाडी मजबूत काम करणार ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ मार्च २०२३ । राज्यातील पुण्यातील कसबापेठ येथील पोटनिवडणूकित महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाबद्दल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. कसब्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. 2024 पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने एकत्रितपणे काम केलं तर विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. तसेच लोकसभेला 40 जागा निवडून येतील असा विश्वास संजय राऊतांनीव्यक्त केला.

चिंचवडमध्ये आमच्याकडून काही बाबतीत चूक झाली. चिंचवडचा विजय हा भाजपचा विजय आहे, हे कोणीच मानणार नाही. चिंचवडमध्ये अनेक वर्षांपासून जगताप पॅटर्न चालतो. हा विजय जगताप पॅटर्नचा असल्याचे संजय राऊत म्हणाले. जर उमेदवार निवडताना अधिकची काळजी आम्ही घेतली असती किंवा राहुल कलाटेंनी माघार घेतली असती तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता असेही राऊत म्हणाले.

या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेचं दर्शन, प्रदर्शन, विकृती पाहायला मिळाली. हे सगळं होऊन सुद्धा कसबा आणि पुण्यातील मतदारांनी सत्ताधाऱ्यांनी जी चपराक दिली, त्यातून त्यांनी धडा घ्यावा. पुणेकर अभिनंदनास पात्र आहेत. ते कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडले नाहीत. घराघरात पैसे देण्याचं काम करण्यात आल्याचे राऊत म्हणाले. जनतेने धनशक्ती लाथाडली. कसबा ही सुरुवात आहे. कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असेही राऊत म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विषय हा स्थानिक पातळीवर घेतला जातो. जिथे शक्य आहे तिथे आम्हा महाविकास आघाडी एकत्र लढू असे राऊत म्हणाले. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हा वेगळा विषय आहे. हा विषय लोकसभा आणि विधानसभेचा असल्याचे संजय राऊत म्हणाले.

शिंदे गटाच्या आमदारांच्या मागणीप्रमाणे अटक होणार असेल तर होऊन जाऊ द्या अटक. कायदा, न्यायालय, पोलीस अजून खोक्याखाली चिरडले नाहीत. अजूनही रामशास्त्री जिवंत असल्याचे राऊत म्हणाले. या 40 आमदारांनी आधी स्वत:चं अंतरंग तपासावं असा टोलाही राऊतांनी लगावला. मी विधीमंडळाचा पूर्ण आदर करतो. माझं वक्तव्य हे विशिष्ट फुटीर गटापुरतं होतं. विधीमंडळाचा मी अपमान करणार नाही. कारण मी त्या सभागृहाचा सदस्य असल्याचे राऊत म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम