दै. बातमीदार I ५ डिसेंबर २०२२ Iसार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 4) सायंकाळी संत तुकाराम नगर पिंपरी येथे करण्यात आली.
सुमित अशोक कारंडे (वय 25, रा. भोसरी), रोहन शिवाजी टेंबाळे (वय 22, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई रमेश दोरताले यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई दोरताले हे रविवारी सायंकाळी संत तुकाराम नगर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज कडून पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी दोघेजण गांजाचे सेवन करताना आढळले. त्यांच्याकडे चौकशी केली असता पोलिसांना गांजा आणि इतर साहित्य आढळून आले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम