निवडणुकीपूर्वीच भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मार्च २०२३ । देशातील कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजप आमदारानं म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केलं. भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी मुस्लिमांना टिपू सुलतानची उपमा देत मुस्लिम नेत्यांना मतं देऊ नका, असं म्हटलं. विजयपुरा येथील यत्नाल इथं एका निवडणूक सभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.

तुमच्या मतदारसंघात एक लाख टिपू सुलतान असल्याचं सर्व आमदार मला सांगतात, असं भाजप आमदार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांना फॉलो करणाऱ्या विजापूरमध्ये तुम्ही निवडणूक कशी जिंकणार? यावर पाटील म्हणाले, विजापूरमध्ये टिपू सुलतानचा एकही अनुयायी निवडणूक जिंकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायीच जिंकतील. त्यामुळं चुकूनही मुस्लिम उमेदवारांना मत देऊ नका, असं आवाहनंच त्यांनी जनतेला केलं.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीपूर्वी टिपू सुलतानचं नाव राज्यात पुन्हा एकदा चर्चेचं केंद्र बनलंय. टिपू सुलतानबद्दल विविध राजकीय पक्षांचे नेते भाष्य करत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी लोकांना टिपू सुलतानच्या कट्टर समर्थकांना मारण्यास सांगितलं. त्यांच्या वंशजांना हद्दपार करून जंगलात पाठवा, असंही ते म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम