त्रिमुर्ती फार्मसी महाविद्यालयात “मैत्रीम २०२३” जल्लोषात

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मार्च २०२३ । पाळधी येथील नामांकित त्रिमुर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात “मैत्रीम २०२३” संस्कृती महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. दि. १९ फेब्रुवारी शिवजयंती पासुन ह्या महोत्सवाला सुरुवात झाली व दि. २४ तारखेला कार्यक्रमची सांगत झाली.

” शिवजयंती” मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली यात अध्यक्ष मनोज पाटील सर यांच्या हस्ते महाराजचे प्रतिमा पुजन करण्यात आले व विद्यार्थ्यांमधुन छत्रपती शिवाजी महाराज व माँसाहेब जिजाऊ यांची भूमिका साकारलेल्या विद्यार्थ्यांचे ही पुजन करण्यात आले व मोठ्या जल्लोषत मिरवणूक काढण्यात आली. पाच दिवसाच्या पहिल्या दिवशी फ्रेशेस पार्टी, दुसऱ्या दिवसापासून विविध डे साडी डे, हॉरर डे, बॉलीवुड डे, किड्स डे, ट्रेडीशनल डे साजरा करण्यात आला.

दिनांक २४ फेब्रुवारी रोजी “मैत्रीम २०२३” मोठ्या जल्लोषत साजरा झाला यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेवुन उत्कृष्ट डान्स परफॉर्मन्स, नाटक, व्याख्यान सुंदर सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवट बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी अध्यक्ष श्री. मनोज पाटील सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले व सरांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले सोबत प्राचार्य डॉ. अंकुर जैन, बाळकृष्ण बाहेती, निलेश पाटील, राकेश गुजर उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. रक्षा सिसोदिया मॅडम यानी केले व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी राहुल खैरनार व उमेश महाजन यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम