केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त विधान : तर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते !
बातमीदार | २९ ऑक्टोबर २०२३
देशभरातील अनेक पक्षाची नेते संत व महापुरुषांच्या बाबतीत बेताल वक्तव्य केल्याने वादात अडकत असतात आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री अशाच एका वादात अडकले आहे. समर्थ रामदास नसते तर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते, असं वक्यव्य केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. गुजरातमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे.
समर्थ रामदास नसते तर छत्रपती शिवाजी महाराज बनले नसते, शिवाजी बनवण्याच्या फॅक्टरीचे सर्व समर्थ गुरू येथे बसले आहेत असं वक्तव्य धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यामुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. याविधानानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा जणीवपूर्वक सातत्याने वाद सुरू ठेवला जातो, कारण बाबासाहेब पुरंदरेनी हा विषय मांडला होता आणि शेवटी त्यांनी माफी मागीतली होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम