राज्याचे उपमुख्यमंत्री पवारांन डेंग्यूची लागण

बातमी शेअर करा...

बातमीदार | २९ ऑक्टोबर २०२३

राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे तर अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. या गावबंदीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसापासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अजित पवार दिसत नव्हते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

आता राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीट करत अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती दिली आहे. अजित पवारांना डेंग्यूची लागण, पुढील काही दिवस आराम करण्याचा डॅाक्टरांनी सल्ला दिल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीट करत दिली आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर अजित पवार पुन्हा कामाला सुरुवात करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम