
राज्याच्या विकासासाठी सहकार्य करा; मुख्यमंत्री शिंदे
दै. बातमीदार । ९ नोव्हेबर २०२२ राज्यातील राजकीय वातावरण खराब होत असतांना अशातच राज्यात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसोबतच दुर्गम आणि दुष्काळग्रस्त भागात कृषी, आरोग्य, शिक्षणाला शासनाने प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रासाठी अमेरिकेने आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशियायी विकास बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलताना केले.
‘वर्षा’ निवासस्थानी मुंबईतील अमेरिकेचे वाणिज्यदूत माईक हँकी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रात कृषी, सायबर सुरक्षा, सौरऊर्जा, उत्पादन आधारित उद्योग गुंतवणूक, जागतिक दर्जाचे शिक्षण क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, की राज्य शासनाने कृषी, शिक्षण, आरोग्य, माहिती व तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम