ठाकरे गटाचे आमदार व नेते रात्री मुख्यमंत्री शिंदे यांना भेटतात; खा.जाधवांचा गोप्यस्फोट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ नोव्हेबर २०२२  राज्याचे राजकारण हे रात्री अपरात्री भेटून शिंदे सरकार आले असल्याची विरोधक नेहमी टीका करीत असतांना दिसून आले आहे, पण आता ठाकरे गटाचे आमदार व खासदार मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत असल्याचा गोप्यस्फोट शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर पुन्हा आता अनेक आमदार, खासदार, नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असल्यामुळे पुन्हा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदारच नाही, तर अनेक खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. भाजप – शिवसेना युती सरकारमधले आमचे शिवसेनेचे अनेक मंत्री, त्यांचे आमदार-खासदारही रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. सह्याद्रीवर जाऊनही एकांतामध्ये त्यांच्या भेटी घेतात. मी स्वतः त्या ठिकाणी हे अनुभवलेले आहे. ही गोष्ट खरी आहे.

आमदार-खासदार मुख्यमंत्र्यांना भेटतातच, असा दावा त्यांनी केला. खासदार जाधव यांनी यापू्र्वीही असाच एक गौप्यस्फोट केला होता. त्यात ते म्हणाले होते की, सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते. अनिल देशमुख आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत. हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम