कोरोनाच्या रुग्णात २४ तासात झाली इतकी वाढ !
दै. बातमीदार । २३ एप्रिल २०२३ । २०१९ नंतर कोरोनाचा उद्रेक जगभर झालेला होता त्यानंतर कसाबसा देश या संकटातून बाहेर आला आहे. त्यानंतर पुन्हा आता एकदा देशात कोरोना रुग्णवाढ सुरूच असून गेल्या 24 तासांत तब्बल 12 हजार 193 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर तब्बल 42 जणांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात 10 हजार 765 जणांनी कोरोनावर मात केली असली तरी नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 67 हजार 556 वर पोहोचली आहे.
देशात दोन दिवस रुग्णसंख्या वाढल्यानंतर गुरुवारी कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते, मात्र शुक्रवारपासून पुन्हा एकदा रुग्णवाढ सुरू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 19 एप्रिल रोजी सर्वाधिक 12 हजार 591 रुग्ण आढळून आले होते. त्याआधी सलग चार दिवस रुग्णांमध्ये घट झाली होती. 14 एप्रिलला 10 हजार 753, 15 एप्रिलला 10 हजार 93, 16 एप्रिलला 9 हजार 111 आणि 17 एप्रिलला 7 हजार 633 रुग्ण आढळून आले होते. त्याच वेळी, 18 एप्रिल रोजी 10,542 कोरोना रुग्ण आढळले. 19 एप्रिल रोजी कोरोनाच्या रुग्णांमध्ये दोन हजारांची वाढ झाली होती. तर आता पुन्हा रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 11,97,477 चाचण्यांमध्ये 12,193 रुग्ण आढळले.
– मुंबईत गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 1685 चाचण्यांमध्ये 177 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर कोरोनामुळे दोघांना जीव गमवावा लागला आहे. नव्या बाधितांमधील 20 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील सहा जणांना ऑक्सिजनची गरज लागली. तर एकाच दिवसात 264 जणांनी कोरोनावर मात केली. मात्र नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 1377 झाली. राज्यात गेल्या 24 तासांत 850 कोरोनाबाधित आढळले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 648 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र नव्या रुग्णांमुळे कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 6167 झाली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम