कोरोना विषाणूच थैमान ; २४ तासात रुग्णसंख्या वाढली !
दै. बातमीदार । ७ एप्रिल २०२३ । देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूनं थैमान घालायला सुरुवात केलीये. गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 100 टक्के वाढ झाली आहे. यामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होवू लागला आहे.
आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, कोरोनाच्या नवीन रुग्णांचा आकडा 6 हजारांच्या पुढं गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 6,050 रुग्ण आढळले आहेत. काल म्हणजेच, गुरुवारी नवीन रुग्णांची संख्या 5,335 होती. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 28,303 झाली आहे. गुरुवारी देशात एकूण 25,587 सक्रिय रुग्ण होते. सक्रिय प्रकरणं सध्या एकूण प्रकरणांपैकी 0.06 टक्के आहेत. विशेष म्हणजे, देशात गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये जवळपास 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 4 एप्रिल रोजी नवीन रुग्णांची संख्या 3,038 होती. 5 एप्रिलला नवीन रुग्णांची संख्या 4,435 वर पोहोचली. दुसऱ्या दिवशी 6 एप्रिल रोजी कोरोनाचे 5,335 रुग्ण आले होते, तर आज 6,050 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम