देशाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवची लाखो रुपयात फसवणूक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जानेवारी २०२३ । देशात फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असून यात सर्वसामान्य जनतेपासून तर आताच देशाचा क्रिकेटपटूला सुद्धा याचा फटका बसला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याची तब्बल 44 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आर्थिक फसवणूक झाल्या प्रकरणी उमेश यादव याने नागपुरातील कोराडी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. उमेशच्या जुन्या मॅनेजरनेच त्याची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. शैलेश ठाकरे असे फसवणूक करणाऱ्या मॅनेजरचे नाव आहे. शैलेश ठाकरे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरु आहे. नागपूर पोलिसांनी याबाबत माहीती दिली आहे.

डीसीपी अश्विनी पाटील यांनी सांगितले की, “शैलेश ठाकरे नावाच्या व्यक्तीने उमेश यादव यांच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी ४४ लाख रुपये घेऊन क्रिकेटपटूची फसवणूक केली. आयपीसी कलम 406 आणि 420 अंतर्गत शैलेश ठाकरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वी उमेशचे उत्पन्न, बँक तपशील आणि इतर सर्व माहीती शैलेशकडेच होत्या. शैलेशने त्याच्याकडून पैसे घेऊन कोणतेही काम केले नाही, असे उमेशचे म्हणणे आहे. उमेशला मालमत्ता खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात ४४ लाख रुपये जमा केले होते. शैलेशने हे सर्व पैसे काढून स्वतःच्या नावावर मालमत्ता खरेदी केली. पैसे परत करण्यास सांगितले तेव्हा शैलेश पळून गेला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम