क्रिकेटपटू युवराज सिंग झाला दुसऱ्यांदा बाप !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ ऑगस्ट २०२३ | देशातील अभिनेते व क्रिकेटरचे आयुष्य नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत येत असते, पण या चर्चेपासून कोसोदूर असलेले क्रिकेटपटू युवराज सिंग मात्र दोन दिवसापासून आपल्या आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. कारण देखील तसेच काही आहे आता युवराज सिंग दुसऱ्यांदा बाप झाला आहे.

क्रिकेटपटू युवराज सिंगची पत्नी हेजल कीच हिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. दुसऱ्यांदा बाप झाल्याचा आनंद युवराजने सोशल मीडियावर शेअर केला. त्याने पत्नी आणि दोन मुलांसोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, ‘आम्ही प्रिन्सेस ऑराचे स्वागत करतो.’ 41 वर्षीय युवराज सिंग दुसऱ्यांदा वडील झाला आहे. गेल्या वर्षी जानेवारीत त्यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. युवराज आणि हेजल कीचचे 2016 मध्ये लग्न झाले होते. युवराज सिंगने शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता सोशल मीडिया हँडलवर बाळाचा फोटो शेअर केला. फोटोमध्ये त्याची पत्नी हेजल आणि मुलगा ओरियन देखील दिसत आहे. युवराजने लिहिले की, “रात्रीची झोप मोडणं आता अधिक आनंददायी झाले आहे. आम्ही राजकुमारी ऑराचे स्वागत करून कुटुंब पूर्ण करत आहोत.” ऑरा या शब्दाचा अर्थ ज्यामध्ये विशेष गुण आहेत, ज्यामुळे ती वेगळी असण्याची जाणीव असा होतो. याला हिंदीत आभा असेही म्हणतात.

युवराज सिंगने सोशल मीडिया अकाऊंटवर कुटुंबासोबतचा हा फोटो पोस्ट केला आहे.

 

युवराज सिंग गेल्या वर्षी 25 जानेवारीला पहिल्यांदा वडील झाला होता. त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव दोघांनी ओरियन ठेवले होते. ओरियन म्हणजे ताऱ्यांचा समूह. ओरियनबद्दल युवराज म्हणाला, ‘ओरियन हा ताऱ्यांचा समूह आहे आणि पालकांसाठी त्यांचे मूल हे ताऱ्यासारखेच असते. युवराज सिंगने 30 नोव्हेंबर 2016 रोजी बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले होते. दोघांनी चंदिगडमध्ये शीख चालीरितींनुसार लग्न केले. त्यानंतर दिल्लीत रिसेप्शन ठेवले आणि गोव्यात पार्टी दिली. लग्नाच्या 5 वर्षानंतर दोघांना पहिले अपत्य झाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम