जनतेला महागाईनंतर दिलासा : तेलाचे दर घसरले !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ ऑगस्ट २०२३ | देशातील जनतेला महागाईचे मोठ मोठे धक्के बसत आहे. टोमाटोनंतर कांद्याने देशातील उत्पादक संकटात सापडले आहे तर दुसरीकडे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही वर्षापासून तेलाच्या किमतीत मोठी चढ उतार दिसत असतांना आज मात्र तेल ५० ते ६० रुपयाने स्वस्त झाले आहे. यातही सूर्यफूल, सोयाबीन तेलाच्या किमती कमी झाल्या, तरी शेंगदाणा तेलाच्या किमतीत, पाहिजे त्या प्रमाणात घट झालेली नाही.

सर्वच गोष्टी महाग होत असताना त्यात काहीसा दिलासा सर्वसामान्यांना खाद्यतेलांच्या किमतीमध्ये मिळाला आहे. खाद्य तेलाच्या किंमतीत आज वर्षभराच्या तुलनेत जवळपास २२ ते २५ टक्क्यांनी घट आहे. कोरोनानंतर जवळपास दोन वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. मागील एका महिन्यात सोयाबीन तेल ३ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. मागणी घटल्याने सोयाबीन खाद्य तेलाचे भाव घसरले आहेत. युक्रेन-रशिया युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत खाद्यतेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. ती आता पूर्वपदावर आली आहे. शिवाय खाद्यतेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी, दर आणि देशभरात झालेले तेलबियांचे एकूण उत्पादन या सगळ्यावर अवलंबून असतात. त्यामुळे यंदा खाद्यतेलाच्या किमती कमी होण्यामागे ही सर्व कारणे असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम