अयोध्यात मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र : तुरुंगात टाकणारे रावण !
दै. बातमीदार । ९ एप्रिल २०२३ । गेल्या दोन दिवसापासून अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या त्यावर आता पडदा पडला असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी अयोध्येत रॅली काढण्यात आल्या. फडणवीस आणि शिंदेंच्या हस्ते महाआरती करण्यात आली. रॅली संपल्यानंतर झालेल्या सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डीवचलं, राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकणारे रावण होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, अयोध्येत भगवेमय वातावरण झाले आहे. प्रभू रामजींचा धनुष्यबाण घेऊन आम्ही आलो आहोत. मुख्यमंत्री बनल्यानंतर मी पहिल्यांदा अयोध्येत आलो आहोत. अयोध्येत राम मंदिर बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न केले आहे. जे मंदिराविषयी विचारत होते त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. हनुमाण चालीसा पठण करणारे रवी राणा आणि खासदार नवणीत राणा यांना देशद्रोहाचा आरोप लावून तुरूंगात टाकण्याचे पाप करणारा राम होती की रावण?, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात सांधुंची झालेली हत्या झाली तेव्हा उद्धव ठाकरे गप्प बसले होते. मात्र आमचे सरकार आले आहे. त्यामुळे साधू-संत सुरक्षित राहतील. त्यांचा सन्मान होईल, असे शिंदे म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम