ग्राहकांना बसणार का फटका : आरबीआयची बँक ऑफ बडोदावर मोठी कारवाई !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ ऑक्टोबर २०२३

देशभरातील अनेक बँकेवर गेल्या काही वर्षापासून आरबीआय कारवाई करीत असतांना एक मोठी बातमी समोर आली आहे. आता भारतीय रिझर्व्ह बँकने बँक ऑफ बडोदावर मोठी कारवाई केली असून आरबीआयने बँक ऑफ बडोदाच्या ‘BoB वर्ल्ड’ मोबाईल अॅपवर नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. या आदेशानंतर नवीन ग्राहक ‘BoB वर्ल्ड’ अॅपमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत.

आरबीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे की, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत बँक ऑफ बडोदाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या निलंबनामुळे विद्यमान ‘BoB वर्ल्ड’ ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यास बँकेला सांगण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. जुलै 2023 मध्ये, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की BoB वर्ल्ड ग्राहकांच्या खात्यांशी छेडछाड करत होते. मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये नोंदणीची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांच्या संपर्क तपशीलांशी लिंक केल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला होता.

यावर बँक ऑफ बडोदाने म्हटले होते की अॅप नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी अनधिकृत किंवा ग्राहक नसलेले मोबाईल नंबर जोडण्याची चर्चा चुकीची आहे. बँक ऑफ बडोदाने असेही म्हटले होते की कोणत्याही ग्राहकाचा एकच मोबाईल नंबर बँकेच्या मोबाईल ऍप्लिकेशन, BoB वर्ल्डसह अनेक बँक खात्यांशी जोडला जाऊ शकत नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम