ऑक्टोबर महिन्यात वाढणार तापमानाचा पारा

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ ऑक्टोबर २०२३

देशातील काही राज्यात परतीचा पाऊस सुरु असून सध्या राज्यात मात्र तापमानाचा पारा वाढला आहे. यामुळे ऑक्टोबर हिटच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. येत्या काळातही तापमानवाढ आणखी तीव्र होणार असल्याने हिवाळ्याचे काय, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

उन्हासोबत वातावरणात आर्द्रतेच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या झळा उन्हाळ्याइतक्याच असह्य असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामानात झालेल्या या बदलामुळे सध्या हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम