बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के !
देशात सुरु असलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने गुरुवारी गुजरातमधील कच्छच्या जखौ बंदराला धडकेल. कच्छ व सौराष्ट्रसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. सायंकाळी उशिरा कच्छमध्ये ३.५ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. दक्षिण अरबी समुद्रात हे वादळ निर्माण झाल्यानंतर गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याने अनेकदा मार्ग बदलला. ते क्षीण झाले आहे.
गुरुवारी ते गुजरातच्या किनाऱ्याला धडकेल तेव्हा त्याचा वेग ताशी १५० नव्हे तर १२५ प्रति किलोमीटरपेक्षाही कमी असेल. हवामान विभागाचे संचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा दैनिक भास्करला म्हणाले, बिपरजॉयमुळे पूर्व व पश्चिमेकडे प्रत्येकी एक अँटी सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झाल्याने वादळाची जणू सँडविचसारखी स्थिती होती. वादळ पुढे सरकत असताना अँटी सायक्लोनही पुढे जात होते. परिणामी ९ दिवस समुद्रात राहूनही यातून अपेक्षित अशी आर्द्रता येऊ शकलेली नाही.
बुधवारी सायंकाळी कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता ३.५ रिश्टर एवढी होती. तत्पूर्वी कच्छ आणि साैराष्ट्रास वादळी वाऱ्यासह पावसाने झाेडपून काढले. साैराष्ट्र व कच्छच्या जिल्ह्यात वादळी वारे वाहत होते. जुनागडमध्ये वादळी वाऱ्यामुळे एक मुलगी नहरीत पडली. त्यात तिच्या भावाचाही मृत्यू झाला. अशा घटनांत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलाने ७० हजार लोकांना छावण्यांत हलवले. कच्छ विमानतळ १६ पर्यंत बंद : वादळी वाऱ्यामुळे कच्छ विमानतळ १६ जूनपर्यंत बंद करण्यात आले. बाजारपेठही १६ पर्यंत बंद राहील. द्वारकाधीश मंदिराच्या शिखरावर १६ जूनपर्यंत ध्वजारोहण करण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. बुधवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुखांकडून माहिती घेतली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम