डायबिटीसचा त्रास आहे ; कांदा खावा कि नाही ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जून २०२३ ।  अनेक लोकांना आरोग्याबाबत वेगवेगळा त्रास असतो त्यातील बहुतेकाना डायबिटीसचा त्रास होताना दिसतो. दररोजचं धावपळीचं जीवन, तणाव, बदलती जीवनशैली, बदलता आहार अशा अनेक गोष्टींमुळे डायबिटीसची समस्या लोकांमध्ये निर्माण होतोना दिसतेय.

डायबिटीस झाल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी लोक अनेक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. पण काही लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर आता आपण अशा एका उपायाबाबत जाणून घेणार आहोत जो डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी मदत करतो. जर तुम्ही डायबेटीस नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असाल तर कांद्याचा उपाय जरूर करा. तर आता हा कांद्याचा नक्की उपाय कोणता याबाबत आपण जाणून घेऊया. कांद्यामध्ये कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, विटामिन सी, फॉलेट, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक असे अनेक घटक असतात. हे घटक शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. कांद्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट सोबत फायबरची मात्र सुद्धा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

डायबिटीसची लक्षणे कोणती?
डायबिटीस मध्ये भूक लागणे, एखादी जखम लवकर बरी न होणे, थकवा जाणवणे डोळ्यावर अंधारी येणे, इन्फेक्शन होणे, हात पाय दुखणे किंवा सूज येणे अशा प्रकारची अनेक लक्षणे असतात.

डायबिटीस पेशंटला कांदा खाण्याचे फायदे
कांद्यात असलेली फायबरची मात्रा डायबिटीस पेशंटसाठी खूप फायदेशीर असते. कारण कांद्यातील फायबर हे शरीरातील ग्लुकोजची मात्रा नियंत्रणात ठेवते आणि त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. डायबिटीज असलेल्या पेशंटना पचनाच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी डायबेटीस पेशंटनी कांदा खाल्ला पाहिजे जेणेकरून अन्नपचन होण्यास मदत होते. कांद्यात अँटिऑक्सिडंट असतात जे शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे ज्या डायबेटीस पेशंटना सुजेची समस्या आहे त्यांनी कच्चा कांदा खाल्ला पाहिजे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम