भाजपात जाण्यावर दादांनी केले ‘राज’ उघड !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ एप्रिल २०२३ ।  राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षनेते अजित पवार सातत्याने चर्चेत आहेत. यावर त्यांनी पुन्हा एकदा प्रकाशझोत टाकलेला आहे. एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अजित पवार आले होते. त्यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांसंदर्भात स्पष्टपणे मत मांडले.

अजित पवार म्हणाले की, 1967 पासून शरद पवार साहेबांवर बारामतीने विश्वास ठेवला आहे. शरद पवार साहेबांनी माझ्यावर 1990 पासून माझ्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासाला मी तडे जाऊ देणार नाही. कोणी काय डोक्यात वेगळा घालायचं प्रयत्न केला तर डोक्यात घेऊ नका, असे स्पष्ट ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांसंदर्भात स्पष्ट म्हणाले. बारामतीचं वातावरण सुरक्षित राहिलं पाहिजे, हे महत्वाचे आहे, असे अजित पवार यांनी म्हटलंय.

मी आमदार असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून काम करून घ्यायला सोपं जातं. पालखी मार्ग अतिशय मोठा झाला आहे. पुढचा राहिलेला आपण चारपदरी करतोय. बारामती शहराचा विकास वेगाने होत आहे. यामध्ये नवीन नवीन दुकानं येताय. बारामतीत वेगळी कन्सेप्ट तयार झाली आहे. जे काही करता येईल ते आपण करु या. निधी आणायला मी खंबीर आहे. बारामतीकरांनी 67 पासून साहेबांवर विश्वास टाकला. त्या विश्वासाला तडे जाऊ देणार नाही

बारामतीचा विकास होत आहे. बारामतीकरांनी आपल्या जमिनी विकू नका, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. बारामतीचा विकास होतानात लोकांनीही आपली जबाबदारी पाळली पाहिजे. इतरत्र कचरा टाकला नाही पाहिजे. विकास झाल्यामुळे जमिनीचा दर वाढत आहे. परंतु आपल्या जमिनी विकू नका.जेवढा नोकऱ्या देता येईल तेवढं करतो. छोटामोठा व्यवसाय केला पाहिजे. बाहेरून येऊन लोकं करतात मात्र बारामतीकरांना का जमतं नाही. जेवढं काही करता येईल ते मी रात्रंदिवस काम करतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम