या कंपनीला बॉस नाही कमवाल बक्कळ पगार ; जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ एप्रिल २०२३ ।  देशातील अनेक तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत. काही काही तरुणांनी अनेक ठिकाणी नोकरी देखील केली आहे. पण प्रत्येक ठिकाणी बॉस चांगला असेल असे नाही अनेक ठिकाणी बॉस चांगला आहे पण वेतन कमी आहे. ज्याठिकाणी वेतन चांगले आहे. त्याठिकाणी बॉसचे टेन्शन असे हे समीकरण जुळून आहे. त्यामुळे तुम्ही अशी नोकरी करू शकतात ज्याठिकाणी वेतन देखील बक्कळ असेल व त्याठिकाणी बॉसचे टेन्शन देखील नसेल.

BJP add

सोशल मीडिया आणि ऑनलाइन शॉपिंगच्या युगात ई-कॉमर्ससह अनेक कंपन्यांच्या वेबसाइटला कंटेंट रायटरची गरज आहे. काही कंपन्या कायमस्वरूपी लेखकांना कामावर घेतात तर काही छोट्या कंपन्या फ्रीलांसरद्वारे लेखन करून घेतात. अशा कंपन्यांसाठी तुम्ही फ्रीलान्सिंगचे काम करू शकता. देशातील अनेक कंपन्यांना हिंदी-इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील कंटेंट आवश्यक आहे.

प्रत्येक कंपनीला विविध प्रकारच्या कंटेंटची आवश्यकता असते जी वापरकर्त्यासाठी उपयुक्त असेल किंवा त्यांना वाचण्यासाठी आकर्षित करते. यासाठी कंपन्या फ्रीलांसर लेखकांना प्रति शब्द चांगली किंमत देतात.फ्रीलान्स कंटेंट रायटिंगमध्ये तुम्हाला 40 पैसे प्रति शब्द ते 1 रुपये प्रति शब्द मिळतात. आपण तांत्रिक किंवा गैर-तांत्रिक लेखन करतात यावर हे अवलंबून आहे. याशिवाय इंग्रजी, हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेत लिहिण्याचे मानधन वेगळे असते.

जर तुम्ही एखाद्या कंपनीसाठी फ्रीलांसर म्हणून कंटेंट रायटिंग करत असाल आणि त्यासाठी तुम्हाला प्रति शब्द 1 रुपये दिले जातात, तर तुम्ही एका दिवसात 3,000 शब्द लिहून 3,000 रुपये सहज कमवू शकता आणि दरमहा सुमारे 90 हजार कमवू शकता. देशात अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यात तुम्ही फ्रीलान्स लेखक म्हणून काम करू शकता. त्यांच्यामध्ये Fiverr आणि Upwork खूप लोकप्रिय आहेत. याशिवाय तुम्ही स्वतंत्र लेखनासाठी विविध कंपन्यांशी संपर्क साधू शकता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम