अमळनेर शहरातील दगडी दरवाजाचे नविन बांधकाम सुरू असताना कोसळला

बातमी शेअर करा...

दोन मजूर जखमी संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा करोडो रुपये खर्च करून निकृष्ट दर्जाचे काम

अमळनेर : येथील चोपडा रोडावरील शहराच्या मध्यवर्ती भागात पुरातत्वीय वास्तू म्हणून दगडी दरवाजा आहे मागील दोन वर्षापुर्वी हे घसरला होता माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पुढाकार घेऊन हे काम अमळनेर नगरपरिषद अंतर्गत करण्याची मंजूरी आणून दिड करोड रुपये खर्चाच्या अंदाजपत्रक नूसार कामाची सुरुवात ही करण्यात आली सुरुवातीला फक्त एक महिना काम जोराने सुरू झाला मात्र नंतर काम रखडले तीन अडिच वर्ष झाले आजून तीस टक्केच काम झाले आहेत ते ही निकृष्ट दर्जाचे कामाची सुरुवात झाल्यापासून कोणतेही संबंधित अधिकारी व अभियंता कामांवर आम्ही बघितले नाही असे परिसरातील नागरिकांचा म्हणा आहे
दगडी दरवाजाचे एका बाजूचे तेरा चौदा फुट दगड चे नविन बांधकाम उचला गेला होता परंतु आज काम चालू असताना अचानक बांधकाम कोसळला यात आठ ते दहा मजुर काम करत होते एक मोठा अनर्थ टळला दोन मजूर जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे हे काम तातडीने गतिने व चांगल्या पद्धतीने होवावे यासाठी जळगांव नियोजन समितीचे सदस्य पंकज चौधरी आणि सामाजिक कार्यकर्ते नविद शेख यांनी अनेक वेळा निवेदने दिले आंदोलन केले पण शासनाने कोणतही ठोस निर्णय घेऊन काम केले नाही दगडी दरवाजा वेसचे काम उच्चस्तरीय अधिकारी व अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ चांगल्या पद्धतीने होवावे अशी मागणी ही नागरिकान कडून होत आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम