
10 वि 12 वि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव
अमळनेर (आबिद शेख )अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहे.) स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्ररी च्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन हॉल कृषी भुषण मार्ग अमळनेर येथे गुणगौरव (हौसला अफजाई) व करियर गाईडन्स प्रोग्राम दि. 25 जुन रोजी आयोजि त करण्यात आला, ज्या विद्यार्थ्यांनी 10 वी आणि 12 वी मध्ये लक्षणीय यश संपादित केले अशा विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या गुणांचा गौरव करण्यात आला. त्याच सोबत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणमान्य व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला*
*समाजामध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या पाच गणमान्य व्यक्तींना पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले*
*त्यामध्ये डाॅ.रागिब अहमद जळगाव*
*यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी साठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर धुळे येथील प्रसिद्ध समाजसेवक व विधिज्ञ ऍड. जुबेर शेख यांना खैरखा ए मिल्लत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*
*व शरीफ सोज़ सर साहेब धुळे यांना शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*
*फयाज़ शेख अहमद निगराह S D I अमळनेर*
*यांना धार्मिक व शैक्षणिक अवार्ड तर राजू शेख अलाओद्दीन मिस्त्री अमळनेर*
*यांना आरोग्य व समाजसेवा अवार्ड प्रदान करून सम्मानित करण्यात आले*
*10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना करियर गाईडन्स करण्यात आले*
*कार्यक्रमाची सुरूवात कुराण पठण करून करण्यात आली स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्ररी चे अध्यक्ष रियाज़ शेख यांनी प्रास्ताविक सादर केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुफ्ती ज़ाहिद हुसेन साहाब किबला यांनीही सदिच्छा व्याक्त केल्या*
*डाॅ.रागीब अहमद साहेब*
*मोटीवेशनल स्पीकर जळगाव यांनी दहावी बारावी नंतर मुला मुलींनी काय करावे असे मार्गदर्शन केले*
*ऍड. जुबेर शेख साहेब*
*अध्यक्ष-दक्ष फाऊंडेशन धुळे यांनीही करियर निवडतांना सर्वप्रथम स्वतःच्या व्यक्तिमत्वास जाणून घेणे व त्याच अनुषंगाने उत्तुंग ध्येय ठेवणे याबाबत आपले विचार मांडले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले*
*शरीफ सोज़ सर साहेब*
*लेखक कवि आदर्श शिक्षक (धुळे) यांनी सुत्रसंचालन केले*
*आभार प्रदर्शन इकबाल शेख यांनी केले*
*या प्रसंगी कौसर सर धुळे,फहिम पटेल,रहिम शेख जलगाव, अताऊर्रहेमान जर्नलिस्ट, धुळे,हजी ताहेर शेख,नसीर हाजी साहाब,फय्याज भाई,अॅड.रियाज़ काजी. अॅड. शकील काजी मुशताक सर,लाईक खान इंजीनियर,अखलाक शेख,जाकीर शेख,अता उल्लाह सर,फारुक भाई सुरभी,जाकीर खाटीक सर,रियाज़ ठेकेदार,शरीफ भाई इम्रान खाटीक,शकील H D F C, जाकीर भाई रद्दीवाले,जहुर दादा,सगीर भाई,अजहर नूरी,कारी मोहतेशीम इकबाल भाई,मुस्तफा पलम्बर,रईस शेख,क़मर अली शाह,डाॅ. रईस बागवान, अमजद अली शाह,फयाज सर,मुन्ना भाई पत्रकार, मोअज़िंम भाई,अनिस सर,मोइन सर अहतेशाम भाई,अलीम शेख, बाबा शेख,अब्दुल मुत्ताल्लिब,शब्बीर भाई,रहिम मिस्त्री,आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते*

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम