बंद घरात आढळले ४ लोकांचे मृतदेह !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २० नोव्हेबर २०२३

देशभरात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना सध्या पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह घरात आढळल्याने मोठी खळबळ उडाली असून एकाच कुटुंबातील ४ लोकांचे मृतदेह घरात आढळले. बृंदावन कर्माकर (वय ५२), पत्नी देवाश्री कर्माकर आणि मुलगी देबलीना ( वय १७) आणि मुलगा उत्साह ( वय ८) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. बृंदावन कर्माकर हे कपड्याचे व्यापारी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, खर्डा विभागात एम.एस मुखर्जी रोड येथे रविवारी एका बंद घरात हे मृतदेह आढळून आले. बृंदाबन कर्माकर यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना आधी विष दिले. नंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. बृंदावन यांचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर इतर तीन मृतदेह फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. घटनास्थळी एक चिठ्ठीही सापडली. त्यामध्ये पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे नमूद केले होते. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्यानंतर संतापलेल्या कर्माकर यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याने काही लोकांनी पोलिसांना कळवले. दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडावा लागला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. कर्माकर यांचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर पत्नी आणि मुलांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते, असेही पोलिसांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम