अभिनेत्याच्या वक्तव्याने वेधले लक्ष : मी जन्माने मारवाडी असलो तरी

बातमी शेअर करा...

बातमीदार | २० नोव्हेबर २०२३

गेल्या काही वर्षापासून राज्यात मराठी अमराठी वाद सुरु होता पण हा वाद सध्या मावळला असला तरी मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी यांच्या वक्तव्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. जितेंद्रनं आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्याने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. नुकताच तो ‘नाळ २’ चित्रपटात पाहायला मिळाला.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जितेंद्र जोशीने केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. तो म्हणाला की, मी जन्माने मारवाडी असलो तरी मी अमराठी नाही. जितेंद्र जोशी म्हणाला की, जन्माने मी मारवाडी असलो तरी मी अमराठी नाही, मी मराठीच आहे. राजस्थानमध्ये जन्माला आलेला मुसलमान हा मारवाडी असतो तसाच महाराष्ट्रात जन्माला आलेला मारवाडी हा मराठीच आहे.

जोशी आडनाव असल्यामुळे कित्येकदा जितेंद्रला मराठीच असल्याचे म्हटले गेले होते. परंतु तो मारवाडी आहे, याचा खुलासा त्यानेच अगोदर केलेला होता. नाळ २ चित्रपटाबद्दल जितेंद्र जोशी म्हणाला की, नाळ भाग २साठी मला नागराजने विचारले. तो मला म्हणाला की, छोटी भूमिका आहे, पण खूपच महत्त्वाची आहे. तर करशील का? त्यावर मी त्याला म्हणालो की, तू करतोयस हा चित्रपट तर मी काम का नाही करणार. असा माझा नाळ २मध्ये प्रवेश झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम