भुसावळमध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांना जीवे मारण्याची धमकी, संशयीत नेपानगरात अटकेत

बातमी शेअर करा...

भुसावळ येथील प्रमोद सावकारे यांना एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून आठ ते नऊ वेळा कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शनिवार, 1 जून रोजी घडला. यामुळे भुसावळातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली. या घटनेनंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयीताचा कसून शोध घेतल्यावर रविवारी नेपानगर (मध्यप्रदेश) येथून त्याला अटक केली. संशयीताची चौकशी उशिरापर्यंत सुरू होती.

सावकारेंना सतत धमकीचे फोन

शनिवार, 1 जून रोजी प्रमोद सावकारे हे वाल्मीक नगरातील एक कुटुंबीयांना सांत्वन देण्यासाठी गेले होते. परत आल्यानंतर दुपारी 1.38 वाजता त्यांना अज्ञात क्रमांकावरून कॉल आला, ज्यात ‘या प्रकरणात सहभागी होऊ नका, अन्यथा जीवे मारू’ अशी धमकी देण्यात आली. यानंतर सातत्याने आठ ते नऊ वेळा पुन्हा कॉल आल्याने सावकारे यांनी सायंकाळी बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवली.

नेपानगरात संशयीताची अटक

भुसावळमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही धमकीची घटना गंभीरतेने घेतली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर संशयीत रवी आर.के. याला नेपानगर (मध्यप्रदेश) येथून रविवारी ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे आणि बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांनी त्याची चौकशी केली, परंतु चौकशीचा तपशील अद्याप समजू शकला नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम