शिरसोलीतील युवकाला ऑनलाइन फसवणूक: ५ लाख रुपये गमावले

बातमी शेअर करा...

टेलिग्रामवर बनावट आयडी तयार करून आणि टास्कच्या नावाखाली पैसे मिळवण्याचे आमिष दाखवून, शिरसोलीतील २७ वर्षीय युवकाची तब्बल ५ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात दिव्या बस्सी आणि प्रिया शर्मा या युवतींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्या युवकाचे नाव शुभम दिलीप लांबोळे आहे (वय २७, रा. शिरसोली, ता. जळगाव). २८ आणि २९ मे रोजी प्रिया शर्मा नावाच्या युवतीने व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर संदेश पाठवून शुभमशी संपर्क साधला. त्यानंतर दिव्या बस्सी नामक युवतीनेही वारंवार संपर्क साधून, शुभमचा विश्वास संपादन केला. त्यांनी शुभमला विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले आणि त्यात पैसे गुंतवल्यास अधिक नफा होईल असे आमिष दाखवले. यामुळे शुभमने आपल्या बँकेच्या तीन वेगवेगळ्या खात्यांमधून एकूण ५ लाख २३ हजार रुपये ट्रान्सफर केले.

मात्र, अपेक्षित नफा न मिळाल्याने आणि केवळ २८०० रुपयेच परत मिळाल्याने शुभमला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. काही वेळेनंतर संबंधित अकाऊंट्स आणि फोन नंबर बंद झाल्याने, शुभमने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात प्रिया शर्मा आणि दिव्या बस्सी या अज्ञात युवतींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करत आहेत.

अमळनेरमध्ये बनावट पतंजली वेबसाइटवरून ३३ हजारांचा फसवणूक

अमळनेर येथे एका बनावट पतंजली वेबसाइटच्या माध्यमातून ३३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबतही जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम