ठरलं मग : विरोधकांच्या आघाडीचे नाव INDIA !
दै. बातमीदार । १८ जुलै २०२३ । देशातील भारतीय जनता पार्टीला आगामी निवडणुकीत हरविण्यासाठी सर्वच विरोधक गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रीय बैठकीचे आयोजन केले होते. त्यातील आजच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी बैठकीला हजेरी लावलेली आहे. हि बैठक बंगळुरू येथे सुरु आहे. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्ष या आघाडीत सामील झाले असून या आघाडीचं नाव निश्चित कऱण्यात आलं आहे. नावाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं.
विपक्षी नेताओं ने बेंगलुरु में गठबंधन का नाम INDIA रखा (सूत्रों से मिली जानकारी)
I – Indian
N – National
D – Democractic
I – Inclusive
A – Alliance #INDIA | #OppositionMeeting pic.twitter.com/yyIxHp9y6A— News24 (@news24tvchannel) July 18, 2023
बंगळुरू येथे विरोधकांच्या वतीने दोन दिवसीय बैठकीचं आयोजन कऱण्यात आले होते. याच बैठकीत विरोधकांच्या आघाडीला INDIA असं नाव देण्यात आलं आहे. अर्थात I- Indian, N – National, D-Democractic, I- Inclusive, A- Alliance असं हे नाव आहे. याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
या नावाचा अर्थ भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी असा असू शकतो. मात्र याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. या बैठकीत २६ विरोधीपक्ष उपस्थित होते. याच बैठकीत आगामी काळातील नियोजन निश्चित करण्यात आलं आहे. याआधीच काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छूक नसल्याचं म्हटलं आहे. बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे. काँग्रेसने पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम