बाजारात कच्या तेलाच्या दरात घट ; पेट्रोल-डीझेल दर कमी होणार ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ नोव्हेबर २०२२ । डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलच्या प्राईजमध्ये घट झाल्यानंतर 77.65 डॉलर प्रति बॅरलवर ट्रेड करत आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईलच्या प्राईजमध्येही घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड ऑईल 85.41 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास ट्रेड करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं घट होत असल्याचं दिसून येत आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट झाली आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Price) कमी झाल्या आहेत की नाही हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. गुरुवारी म्हणजेच, 24 नोव्हेंबर 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही मोठा बदल झालेला नाही. दर अजूनही स्थिर आहेत. देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घेऊया…

देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशात सलग 183व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत यापूर्वी 22 मे रोजी देशातील चार महानगरांमध्ये झाला होता. जवळपास सहा महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, 22 मे 2022 रोजी सरकारनं उत्पादन शुल्क कमी केलं होतं, त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम