बातमीदार | ४ नोव्हेबर २०२३
देशभरातील प्रत्येक व्यक्ती दिवाळीमध्ये खूप आनंदी असतो तर प्रत्येक घराला सुंदर सजविण्यासाठी अनेक युक्त्या देखील करीत असता संपूर्ण परिसरात आपले घर उत्तम कसे दिसेल यावर अनेकांचा भर असतो. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ९ नोव्हेंबरला वसूबारसपासून दिवाळीची सुरूवात होणार आहे. दिवाळीचा सण आपल्या देशात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो.
दिवाळीच्या आधी सर्व जण घरांची स्वच्छता करतात आणि घराची सजावट करतात. जर तुम्हाला तुमचे घर दिवाळीला सुंदर सजवायचे असेल तर हे आर्टिकल तुम्ही शेवटपर्यंत वाचा. दिवाळीत घर सजवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
दिव्यांशिवाय दिवाळीच्या सणाची कल्पना करणे देखील व्यर्थ आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण होयं. दिवाळीमध्ये दिव्यांना फार महत्व आहे. त्यामुळे, घर सजवण्यासाठी दिव्यांचा आकर्षक पद्धतीने वापर करता येऊ शकतो.
तुम्ही कलरफूल दिव्यांचा देखील वापर नक्कीच करू शकता. बाजारामध्ये अशा प्रकारचे दिवे सहज मिळतात.
दिवाळीमध्ये दिव्यांनंतर अधिक महत्वपूर्ण असलेली रांगोळी सर्वांच्या आवडीची आहे. रांगोळीमुळे आपल्या घराच्या अंगणाला शोभा येते. त्यामुळे, खास दिवाळीमध्ये तुम्ही विविध प्रकारच्या, डिझाईन्सच्या, पानाफुलांच्या रांगोळ्या काढू शकता.
रंगांचा वापर करून रांगोळ्या तर काढल्या जाताताच. परंतु, यासोबतच विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून ही तुम्ही रांगोळ्या काढू शकता. यामुळे, तुमच्या घराच्या सजावटीमध्ये आणखी भर पडेल यात काही शंका नाही.
दिवाळीमध्ये दिव्यांसोबतच आपण विविध प्रकारच्या लाईट्सचा ही वापर करतो. लाईटिंगच्या सजावटीमुळे घराला मस्त लूक येतो. मार्केटमध्ये आजकाल लाईटिंगचे अनेक प्रकार उपलब्ध झाले आहेत.
बाल्कनीमध्ये देखील लाईटिंगचा वापर केला जाऊ शकतो. या लाईटिंगच्या माळांमुळे घराचा लूकच बदलून जाईल. त्यामुळे, घराच्या सजावटीसाठी लाईटिंगचा नक्की वापर करा. रात्रीची ही लाईटिंग खूप छान दिसते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम