तांदळवाडी विकासो चेअरमन दिपक पाटील, व्हा.चेअरमन अरूण धनगर बिनविरोध 

advt office
बातमी शेअर करा...

 

चोपडा l प्रतिनिधी

चोपडा तालुक्यातील तांदळवाडी येथील विविध सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली. यात चेअरमन पदी दिपक आधार पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी अरूण छन्नू धनगर यांची खेेेळीमेेेळीच्या वातावरणात बिनविरोध निवड करण्यात आली.

 

गावाने एकत्र येत सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक बिनविरोध पार पाडली. यात नवनियुक्त संचालक धनराज पोपट पाटील, गोपाल नवल धनगर, सुनिल गयभू पाटील, देवेंद्र भिलाजी पाटील, शिवाजी पुंडलिक पाटील, शांताराम देविदास कोळी, नंदलाल उत्तम धनगर, महेंद्र यादव धनगर, दशरथ निंबा धनगर, सुशिलाबाई गयभू पाटील, मंगलाबाई प्रकाश धनगर हे संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.

निडणूक बिनविरोध करणेकामी तसेच चेअरमन व व्हाईस चेअरमन बिनविरोध होण्यासाठी सुनिल गयभू पाटील, गोपाल नवल धनगर, नंदलाल उत्तम धनगर, शिवाजी पुंडलिक पाटील यांनी सुचक अनुमोदन देवून विशेष सहकार्य केले.

सोसायटीच्या निवडणुकीचे कार्य पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.व्ही महाजन यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोसायटीचे सचिव एस.बी.सोनवणे यांनी काम पाहिले.

https://wp.me/pdOF3m-cO

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष, उपाध्यक्षांची  निवड पार पडली. कार्यक्रमाचा समारोप मान्यवरांच्या सत्काराने करण्यात आला.

https://fb.watch/eaDRErIeGV/https://fb.watch/eaDU6sN7-w/

तसेच दूरध्वनीवरून माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, जिल्हा बॅंकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन डाॅ सुरेश पाटील यांनी शुभेच्छा देवून कौतूक केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम