
संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाउंडेशन तर्फे वारकऱ्यांना फराळाचे वाटप
अमळनेर(प्रतिनिधी) संभाजी ब्रिगेड – राजमुद्रा फाउंडेशन व नगरसेवक शाम पाटील यांच्या सहकार्याने शहरातील भक्तीशक्ती शिल्प येथे बाहेर गावावरून येणाऱ्या वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.मांडळ, वालखेडा , ढेकू , आर्डी, शिरसाळे , तरवाडे या गावांवरून पायी दिंडीने वारकरी प्रतिपंढरपूर असलेल्या अमळनेरातील संत सखाराम महाराजांच्या वाडी संस्थान येथील विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात त्यांच्यासाठी राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष शाम पाटील यांनी फराळाची व्यवस्था केलेली होती.
यात प्रत्येक वारकरी मंडळीला उपवास चिवडा , राजगिरा लाडू,पाण्याची बॉटल आणि केळी देण्यात आली. यावेळी वारकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराजांच्या भक्ती शक्ती शिल्पाचे दर्शन घेतले.
यावेळी नगरसेवक शाम पाटील तसेच राजमुद्रा फाउंडेशनचे अक्षय चव्हाण , किरण सूर्यवंशी , निनाद शिसोदे , दर्पण वाघ , मयूर पाटील , विशाल पाटील , उज्वल मोरे , तेजस पवार , राहुल पाटील , किशोर पाटील , गौरव पवार , तुषार वायकर , निखिल सूर्यवंशी , भूषण भदाणे , खिलेश पवार , पिंटू जैन व इतर सदस्य उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम