दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया अडचणीत ; सीबीआयकडून समन्स 

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ ऑक्टोबर २०२२ । आम आदमी पार्टीचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. दि १७ रोजी ११ वाजता त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. सिसोदिया यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. दिल्लीतील दारु धोरण सिसोदिया यांना भोवण्याची शक्यता आहे. याचसंबंधी नुकतंच ईडीने सिसोदिया यांचे निकटवर्तीय समीर महेंद्रू यांना अटक केली होती. आता सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

एक्साइज पॉलिसीच्या केसमध्ये सीबीआयने हे समन्स बजावले आहे. सिसोदिया यांनी एक ट्विट करुन ही माहिती दिली. ”सीबीआयने माझ्या घरी १४ तास रेड केली. परंतु काहीच मिळालं नाही. माझं बँक लॉकर तपासलं त्यातही काही मिळालं नाही, माझ्या गावात यांना काहीच मिळालं नव्हतं. आता मला उद्या ११ वाजता सीबीआय मुख्यालयात बोलावलं आहे. मी जाणार आणि पूर्ण सहकार्य करणार. सत्यमेव जयते.” असं ट्विट सिसोदिया यांनी आज केलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम