निलेश राणे निवडणूक लढण्याची हिम्मत करणार नाही ; नाईक

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ ऑक्टोबर २०२२ ।  शिंदे गटाचे सांगोला मतदार संघाचे आमदार शहाजीबापू पाटील हे कोकण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर सडकून टीका केली. या टीकेला कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. तसेच नाईक यांनी राणे पिता पुत्रांचाही चांगलाच समाचार घेतला. शहाजीबापू पाटलांना कोकणचा इतिहास माहिती नसल्याचे म्हणत जोरदार टीका केली.

वैभव नाईक म्हणाले कि, आमदार शहाजी पाटलांना कोकणचा इतिहास माहिती नाही. या मतदार संघात निलेश राणे पुन्हा खासदार होतील याची तुम्ही स्वप्ने बघावी. मी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे निलेश राणे पुन्हा ही निवडणूक लढण्याची हिम्मत करणार नाहीत. तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीसदर्भात बोलताना नाईक म्हणाले कि, एकमेकमेकांवर टीका करणारे आज कोणत्या कारणासाठी एकत्र आले याचे उत्तर राणे पिता पुत्रांनी द्यावे असेही नाईक म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम