पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ ऑक्टोबर २०२३

राज्यभरात नवरात्र आता अंतिम टप्यात आला असून आज दसऱ्याच्या निमित्ताने राज्यात अनेक सभा होत असतात. यातील एक महत्वाची सभा मानली जाणारी म्हणजे भगवान गडावर होणाऱ्या मुंडे परिवाराची सभा नेहमीच चर्चेत येत असते आज देखील हि सभा चर्चेत आली आहे. यंदाच्या सभेत देखील पंकजा मुंडे बोलत आहे. यावेळी सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय.

भगवान भक्तिगड ट्रस्टच्या वतीने पंकजा मुंडेंचा सत्कार करण्यात आला. सभेआधी साडी-चोळी आणि पुष्पाहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यासाठी पंकजा मुंडेंचं व्यासपीठावर आगमन झालं.पंकजा मुंडेंचं सावरगावमध्ये कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी केली आहे. सावरगावमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेसाठी अवघा जनसागर लोटला आहे. भगवानगडावर आयोजित दसरा मेळाव्याला हजारो समर्थकांच्या उपस्थितीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज्यात काही दिवसांपूर्वीच त्यांनी परिक्रमा यात्रा काढून राज्यभर भेटी दिल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागेल आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम