ठाकरेंनी खरं बोलून दाखवावं ; नितेश राणेंचे आव्हान !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ ऑक्टोबर २०२३

राज्यात आज शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे या मेळाव्यासाठी अनेक जिल्ह्यातून कार्यकर्ते मुंबई दाखल देखील झाले आहे. शिवतीर्थावरुन उद्धव ठाकरेंचा तर आझाद मैदानातून एकनाथ शिंदे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. पण भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शिवतीर्थाच्या व्यासपीठावरुन त्यांनी खरं बोलून दाखवावं, असं आव्हान त्यांनी राणे यांनी दिलं आहे. नितेश राणे म्हणाले, विजयादशमीनिमित्त आज रावण दहन केलं जातं. आजच्या दिवशी दहा तोंडाचा रावण शीवतीर्थावरुन आज भारताविरोधात भाषण करणार आहे. पण संजय राऊतांनी म्हटलं की, आजचा दिवस हा खरं बोलण्याचा दिवस आहे. त्यामुळं मी उद्धव ठाकरेंना आव्हान देतो की त्यांनी शीवतीर्थाच्या व्यासपीठावरुन खरं बोलून दाखवावं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम