
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला ‘वंदे भारत एक्सप्रेस’ अनुभव !
दै. बातमीदार । १४ जुलै २०२३ । राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारमध्ये नव्याने उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दि.१४ रोजी राष्ट्रवादीच्या ८ मंत्र्यांना देखील खाते वाटप झाले असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने नाशिकला रवाना झाले. या प्रवासादरम्यान ठाणे रेल्वे स्थानकावर अजित पवारांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.
नाशिक येथे अजित पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिक रोड ते शासकिय विश्रामग्रहापर्यंत कार्यकर्त्यांकडून बाइक रॅली सुद्धा काढण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नाशिक येथे होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी भव्य तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणाक शक्तिप्रदर्शन देखील केले जाणार आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर अजित पवारांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. राज्यभरातील लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना योग्यरित्या पोहचाव्यात यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यभरात १० ठिकाणी असे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यानंतर नाशिकमध्ये होणारा हा ११ वा कार्यक्रम असणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम