‘आत्मनिर्भर भारत’ मध्ये फ्रान्स हा महत्त्वाचा भागीदार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ जुलै २०२३ ।  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असतांना प्रत्येक देशातील दिग्गज मंडळी त्यांचा सत्कार खास पद्धतीने करीत आहे. हिंदुस्थानच्या ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानात फ्रान्स हा महत्त्वाचा भागीदार आहे. संरक्षण सहकार्य हे दोन्ही देशांतील दृढ संबंधातील आधारस्तंभ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

फ्रान्स दौऱयाच्या दुसऱया दिवशी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यानंतर दोघांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. हिंदुस्थानी नौदलांसाठी 23 राफेल लढाऊ विमाने आणि 3 पाणबुडय़ा फ्रान्सकडून खरेदी करणार आहे. याविषयी पत्रकार परिषदेत थेट घोषणा करण्यात आली नाही. पंतप्रधान मोदी यांना फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी भोजनासाठी निमंत्रण दिले. याचवेळी मोदी यांना ‘ग्रॅण्ड क्रॉस ऑफ लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान मिळविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले हिंदुस्थानी आहेत.

फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पॅरिसच्या आकाशात झेपावलेल्या तीन हिंदुस्थानी राफेल विमानांपैकी एका विमानाचे सारथ्य परभणीतील मराठमोळ्या वैमानिकाने केले होते. 34 वर्षांच्या स्क्वाड्रन लिडर सुशील शिंदे यांनी केलेले हे उड्डाण टीव्हीवर पाहताना महाराष्ट्रात, पूर्णा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे वडील शंकर शिंदे यांची मान अभिमानाने उंचावली. सुशील यांची बहीण देखील हवाई दलात अधिकारी आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम