उपमुख्यमंत्री फडणवीसांनी हास्यजत्रेचा प्रयोग केला सादर ; उद्धव ठाकरे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जून २०२३ ।  57 वर्षांपूर्वींच्या शिवसैनिकांचा जोश अजूनही कायम आहे. इथ आपल्या मेळाव्याला गर्दी झाली असून नेस्को सेंटरमध्ये गारदीची टोळी जमली आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

षण्मुखानंद हॉलमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तर कोण सुर्य? तुमचा सुर्य मणिपूरमध्ये का उगवत नाही असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर का जात नाही, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उपस्थित केला आहे.अमित शहा म्हणजे एक इंजिन जाऊन आले आहे. दुसरे इजिन जातच नाही. मणिपूर पेटले आहे आणि मोदी अमेरिकेला जात आहे. तुमचे डबल इंजिन सरकार पुढे जातच नाहीये. हे सरकार वाफेवर चालते का? डबल इंजिन सरकार रुळावरुन घसरल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, हास्यजत्रेचा एक प्रयोग देवेंद्र फडणवीसांनी सादर केला आहे. यांच्या डोक्यात कुठून व्हायरस घुसला आहे, तेच कळत नाही. कोविडची लस मोदीजींनी तयार केली, मग संशोधक काय गहू कुटत बसले होते. हे असले अंधभक्त आणि त्यांचे गुरू बघितल्यावर त्यांना कोणतं वॅक्सिन द्यावं. या सर्व मानसिक रुग्णांना समीर चौगुलेंच्या समुपदेशन केंद्रात पाठवले पाहिजे. हे सर्व एकापेक्षा एक अवली आहेत. लव्हली कुणीच नाही. त्यांना सांगायला पाहिजे, तुम्ही अवली असला तरी जनता कावली आहे. तुम्ही आमची झोप उडवली. सगळेच पळवली. उद्धव ठाकरे म्हणाले की, मला काही काही वेळा राहुल गांधींचे आवडते. राहुल गांधी म्हणाले, ब्रह्मदेव यांच्याजवळ बसले तर ते देवालाही समजावतील. मला हे पटले. जर हे लस बनवू शकत असतील तर देवालाही समजावतील की ब्रह्मांड कसे चालवायचे.

दुसऱ्यांना छळणे ही यांची विकृती आहे असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. सीमेवर शेपट्या घालता आणि इकडे ईडी सीबीआय घेऊन आमच्यावर येता. ही माझ्या मन की बात नाही. ही मणिपूर की बात आहे. मार्मिकमधील रविवारची जत्रा देशाचे राजकारण सांगून द्यायची. ठाकरे म्हणाले की, आता कोर्टाचा निकाल लागला आहे. तो निकाल लागल्यानंतर त्यांना फिरतीचा अनुभव कामाला येईल. सुरतेला कसे जायचे. गुवाहाटीला कुठे राहायचे, काय पाहायचे. टेबलावर कसे नाचायचे हे शिंदे गटातील लोक करतील. जाहिरातीवर जेवढा खर्च करता तितका पैसा जर शेतकऱ्यांना दिला असता तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता. हे आल्यानंतर पाऊस लांबणीवर चालला आहे. पाऊस लवकर येऊ दे. बळीराजावर संकट येऊ देऊ नको अशी देवालाच प्रार्थना करावी लागेल. कारण हे बळीराजाला मदत करणार नाही. यांचा जाहीरातीवरच जास्त खर्च चालला आहे.

मी उमेद कधी हरलो नाही. हरूच शकत नाही. शिवसेना प्रमुख आपल्याकडे बघत आहेत, आपली परीक्षा घेत आहेत, असे मला नेहमी वाटतं. शिवसेनेला हे आव्हान नवे नाही. शिवसेना जिथे तिथे आव्हान असलेच पाहिजे. आपल्याला आपल्यातल्याच गद्दाराने आव्हान दिलेच आहे, मात्र एकेकाळच्या मित्राने दिले आहे. हे आव्हान आपण मोडून काढणारच. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हटल्यावर नुसता गल्ल्यावर बसला आहे आणि चार नंबरला चहा दे रे तसे नाही. हे आव्हान मी तुमच्या साथीने मोडून काढणारच. उद्या गद्दार दिन आहे. आज उद्धव ठाकरेला काय किंमत आहे. पण तरी अमित शहांना सातत्याने महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरेचा जप करावा लागतो. तेवढा जप रामाचा केला असता तर पुण्य लाभले असते. तुम्ही बाळासाहेबांचा फोटो चोरा, पण यांच्या मनातले बाळासाहेब तुम्ही चोरू शकणार नाही. असेही ते म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम