दिवाळीपूर्वीच सोन्याचे दर वाढले तर चांदीचे ?
बातमीदार | २९ ऑक्टोबर २०२३
देशभरात येत्या काही दिवसावर दिवाळी हा सन येवून ठेपला आहे. त्यामुळे बाजार पेठेत दिवाळीची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झालेली दिसत असली तरी देशातील महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सध्या सोन्या चांदीच्या किमती वाढल्यामुळे याच ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीचे भाव उतरले आहेत. यासोबत प्लॅटिनमच्या किमतीत देखील घसरण झाली आहे.
Good Returns नुसार आज, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची (Gold Price Today) किंमत 56,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,960 रू. असा सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,800 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,960 रुपयांनी व्यवहार करत आहे. शुक्रवारी सोने चांदीच्या किमतींमध्ये घसरण झाली नसल्यामुळे सराफ बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 56,800 रुपये
मुंबई – 56,800 रुपये
नागपूर – 56,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 61,960 रूपये
मुंबई – 61,960 रूपये
नागपूर – 61,960 रुपये
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम