उपमुख्यमंत्री पवारांची मोठी घोषणा :शेतकऱ्यांची रक्कम केली दुप्पट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जुलै २०२३ ।  राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने थैमान घातले असतांना अनेक शेतकरीचे मोठे नुकसान झाले असून राज्यातील शिंदे फडणवीस व पवार यांच्या सरकार या शेतकरीच्या मदतीसाठी धावून आले आहेत. राज्यातील बुलडाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

पावसाळी अधिवेशनात अजित पवार यांनी मोठी शेतकऱ्यांसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. १९ ते २३ जुलै या कालावधीत यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात पीक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर जिल्ह्यातील पिकांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता पाच हजार ऐवजी १० हजार रुपये मदत देण्यात येईल अशी घोषणा अजित पवार यांनी सभागृहात केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम