देवदर्शनाची इच्छा अपूर्णच : बसचा भीषण अपघात १२ जणांचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ सप्टेंबर २०२३ | देवदर्शनासाठी जात असलेल्या बसचा राजस्थानमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सहा महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृत गुजरातच्या भावनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये एकूण ६० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. बसमधील प्रवासी भावनगरहून मथुरेला दर्शनासाठी जात होते. मात्र भरतपूर-आग्रा महामार्गावर बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. चालक आणि त्याचा साथीदारासह इतर प्रवासीही बसमधून उतरले. चालक आणि त्याचे साथीदार बस पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान अचानक एका ट्रकने बसला जोरदार धडक दिली आणि बाजूला उभ्या असलेल्या लोकांना चिरडले. घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत उपस्थितांनी तातडीने मदतीने पोलीस आणि इतर हेल्पलाईन नंबरवर फोन फिरवले. काही वेळातच मदत तिथे पोहोचली. मात्र अपघात इतका भीषण होता की मृतदेह महामार्गावर विखुरले होते. अपघातानंतर महामार्गावर मोठा चक्का जाम झाला होता. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम