पंकजा मुंडेंच्या राजकीय चर्चेवर देवेद्र फडणवीस म्हणाले…
दै. बातमीदार । ७ जुलै २०२३ । गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील भाजप महिला नेत्या पंकजा मुंडे हे कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतांना पंकजा मुंडेंनी थेट सांगितले कि, सुरु असलेल्या चर्चा असं काहीही नसल्याचं सांगत पाठीत खंजीर खुपसण्याचं माझं रक्त नाही, असं विधान केलं आहे. पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
”भाजपच्या 106 आमदारांच्या मनात काही गोष्टी असतील पण बोलण्याची हिम्मत नाही. माझ्या पक्षाला माझ्याबद्दल सन्मान असेल अशी माझी अपेक्षा आहे, जनतेला लपून छपून काम करणाऱ्यांचा कंटाळा आला आहे” असं म्हणत पंकजा मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याचं स्पष्ट होतंय. ‘माझ्या भूमिकेची प्रतारणा करणाऱ्या भूमिका आजूबाजूला असल्याने मी प्रचंड कन्फ्यूज आहे. मी २० वर्षांमध्ये सुट्टी घेतली नाहीये. मला एक दोन महिन्याच्या सुट्टीची गरज आहे. मला अंतर्मुख होण्यीची गरज आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा ताई आमच्या राष्ट्रीय सचिव आहे. त्या वरिष्ठ नेत्या आहेत. दोन महिने त्या सुट्टी घेणार आहेत. काही असेल तर त्याच्यांशी चर्चा करू. आम्ही त्याच्याशी संपर्क करू मार्ग काढू. विरोधक आमच्यात आल्याने लगेच सर्व गोष्टी काहींना रुचत नाहीत, मान्य होतं नाहीत. दोन्ही बाजूच्या नेत्यांना हे माहीत आहे. त्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या आहेत. वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील त्यांच्या भावना समजून घेतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. राष्ट्रवादी आमच्या सोबत आल्यामुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये ते स्वीकार करण्यासाठी थोडा वेळ लागेल. याआधी आमच्या पक्षातील नेत्यांचा संघर्ष राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे ते स्वीकार करायला वेळ लागेल. या सर्व गोष्टींवर चर्चेतून मार्ग सुटू शकतो. पंकजा मुंडे भाजपच्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्या कायम पक्षासोबत आहेत. त्यामुळे पक्षातील जेष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील, त्यांच्या मनात काही असेल तर आम्ही जाणून घेऊ. पुढेही त्या पक्षात काम करत राहतील. त्याचबरोबर त्या चांगल्या प्रकारे नेतृत्व करत राहतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम