ढेकू रोड परिसरातील भटक्या जनावरांचा बंदोबस्त करा

मा.नगरसेवक शाम पाटील यांचे पालिकेला निवेदन..

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)
ढेकू रोड-पिंपळे रोड परिसरातील भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी मा.नगरसेवक शाम पाटील यांनी केली आहे यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देण्यात आले.
मागील अनेक दिवसांपासून ढेकू रोड-पिंपळे रोड परिसरात भटके कुत्रे लहान मुलांना व जेष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना लक्ष करून चावा घेण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. तसेच डुकरांमुळे अनेक लोकांचे अपघात होऊन गंभीर ईजा झाल्याचे प्रकार देखील घडत असून सततच्या घटना घडत राहिल्यास सामान्य नागरिक किवा लहान बालकांच्या जिवीतास धोका उद्भवू शकतो. तरी पालिकेने उपाययोजना करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी मा.नगरसेवक शाम पाटील यांनी पालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी श्याम पाटील ,सुमित पाटील,गणेश बोरसे, शकील शेख, निखिल सूर्यवंशी हे देखील उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम