मुंदडा ग्लोबलच्या बालगोपालांची ” दहीहंडी” जल्लोशात साजरी

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी) मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्हयु स्कुल मध्ये प्ले ग्रुप व नर्सरी च्या बालगोपालांनी दहीहंडी अतिशय जल्लोशात साजरी केली. आपल्या भारतीय परंपरेमध्ये सण-उत्सव यांना खुप महत्वाचे स्थान आहे. श्रावण महिना तर सणांचा राजा, श्रावणात येणारी जन्माष्टमी म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदीन आपण मोठया उत्साहात साजरा करतो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची बाललीला म्हणजेच दहीहंडी सुध्दा फोडतो. या उत्सवाचे औचित्य साधुन आमच्या शाळेतील अॅक्टीव्हीटीमध्ये जन्माष्टमी निमीत्त प्ले – ग्रूप व नर्सरीच्या चिमुकल्यांनी दहीहंडी उत्साहात साजरी केली. नर्सरीचे बालगोपाल कृष्ण, राधा, यशोदा, देवकी, व बलराम इत्यादी वशभुशेत नटुन थटुन आले होते. पाळण्यातील छोटासा कान्हा रूद्रांश राहुल येवले अतिशय सुंदर दिसत होता. सदर कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व प्ले-ग्रुप व नर्सरीच्या शिक्षिका यांनी परीश्रम घेतले.

सदर दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी सर्व बालगोपालांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. ओमप्रकाशजी मुंदडा, चेअरपर्सन सौ छायाभाभी मुंदडा, सहसचिव श्री. योगश मुंदडा, सचिव श्री. अमेय मुंदडा, अॅडमिनीस्ट्रेटर सौ. दिपीका अमेय मुंदडा, श्री. नरेंद्र मुंदडा, श्री. राकेश मुंदडा, श्री. पंकज मुंदडा, सर्व पदाधिकारी यांनी शाळेचे प्राचार्य श्री. लक्ष्मण सर, प्रायमरी प्राचार्या सौ. विद्या मॅडम, प्रि-प्रायमरी को-ऑडीनेटर सौ. योजना ठक्कर, सर्व शिक्षिक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम