अड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे गोकुळाष्टमीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम..

बातमी शेअर करा...

अमळनेर ( प्रतिनिधी)अड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बालगोपाल यांच्या वेगवेगळ्या वेशभूषा सादर करीत विविध कार्यक्रम व नाटिका शाळेत घेण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे संचालक पराग पाटील प्राचार्य विकास चौधरी सर प्राचार्य प्रकाश महाजन सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजन करण्यात आले व संपूर्ण सभागृह सुशोभित करण्यात आले. बाळ गोपाळांनी श्रीकृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत आपली भूमिका साकारली . श्रीकृष्ण राधा व सुदामा यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी त्यांची वेशभूषा परिधान करत मित्रतेवर आधारित नाटिका सादर केली कार्यक्रमाच्या शेवटी कृष्ण राधा व सुदामा यांच्या वेशभूषेत असलेल्या बाळगोपाळांचे चित्रीकरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सूत्रसंचालन प्रा अश्विनी चौधरी मॅडम यांनी केले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम