त्वचेची ही समस्या जाणविल्यास होवू शकतो मधुमेह !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ नोव्हेबर २०२३

अनेकांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या आजाराचा नेहमीच त्रास होत असतो. अशातच मधुमेहाची समस्या ही सर्वसामान्य झाली असून या आजाराची लक्षणं फक्त ज्येष्ठांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही दिसू लागली आहेत. मात्र, त्वचेशी संबंधित समस्या देखील मधुमेहाच्या तीव्रतेचे लक्षण असू शकतात हे तुम्हाला माहित आहे का? खाज सुटणे, त्वचेवर कोरडेपणा जाणवणे आणि लालसरपणा यांसारख्या त्वचेच्या समस्या अगदी सामान्य आहेत. या समस्या ऍलर्जी किंवा अनेक रोगांमुळे देखील होऊ शकतात. पण, प्रत्येक वेळी या समस्यांना हलक्यात घेतले तर त्याचे परिणाम फार गंभीर होऊ शकतात.

कारण त्वचेच्या काही समस्या हे अंतर्गत आजारांचे लक्षणही असू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रक्ताभिसरणाच्या समस्यांमुळे अंगावर खाज येणे, त्वचा कोरडी होणे यांसारख्या त्वचेच्या समस्या देखील असू शकतात. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. या त्वचेच्या समस्यांबरोबरच मधुमेहासारखे दिर्घकालीन आजारही असू शकतात, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित राहिल्यास अशा समस्या उद्भवू शकतात. मधुमेही रुग्णांना त्वचेशी संबंधित कोणत्या समस्या असू शकतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

त्वचेचे व्रण
जर मधुमेहाच्या रुग्णाला त्वचेवर फोड येत असतील तर ते सामान्य आहेत. बोटांवर आणि पायांवर फोड येणे हे सामान्य लक्षण आहे. अनेकदा हे फोड पांढरे असतात. या फोडांमुळे वेदना होत नाहीत आणि दोन ते तीन आठवड्यांत हे फोड आपोआप बरे देखील होतात. हे फोड मधुमेह आणि अनियंत्रित रक्तातील साखरेचे लक्षण देखील असू शकतात. ही समस्या वेळीच गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.

डिजिटल स्क्लेरोसिस
मधुमेही रुग्णांमध्ये डिजिटल स्क्लेरोसिसचा धोकाही मोठ्या प्रमाणात असतो. यामध्ये त्वचा सामान्य त्वचेपेक्षा जास्त जाड होते. ही समस्या मधुमेहींमध्ये दिसून येते. हातांच्या पाठीवरील किंवा बोटांच्या, पायाच्या बोटांवरील त्वचा जाड होऊ शकते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात नसल्यास अशा समस्या उद्भवू शकतात.

नेक्रोबायोसिस लिपोइडिका
नेक्रोबायोसिस म्हणजे पेशी मृत होणे. त्वचेवर लहान, वाढलेले, लाल ठिपके हळूहळू मोठे आणि गडद होऊ शकतात. कधीकधी ते पिवळ्या रंगाचे देखील असतात. यामध्ये त्वचा काळी होते आणि भेगा पडतात. त्यामुळे जखम वाढू शकते. यामध्ये अल्सरचा धोकाही असतो. मधुमेहाची ही लक्षणं जरी असली तरी अशा केसेस क्वचितच आढळतात. एका अहवालानुसार, हा आजार 300 मधुमेही रुग्णांपैकी फक्त एकामध्ये आढळतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम