नावात आहे दम : मनोज नावाच्या व्यक्तीला मिळणार मोफत जेवण !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ नोव्हेबर २०२३

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील प्रत्येक जनतेपर्यत मनोज जरांगे पाटील हे नाव मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पोहचले आहे. जरांगे यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. एका मराठा बांधवाने अनोखा उपक्रम सुरू केला असून याची सर्वत्र चर्चा होत आहे.

आपल्याकडूनही मनोज जरांगे यांना त्यांना समर्थन मिळावं असा विचार मनात घेऊन मनोज नावाच्या नागरिकांना मोफत जेवन दिलं जात आहे. बाळासाहेब भोजने असं हॉटेल मालकाचं नाव असून त्यांनी जरांगे यांचे नाव ‘मनोज’ असल्याने त्यांच्या नावकऱ्यांना मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी येत असताना मनोज नावाच्या व्यक्तीने स्वतःचे आधार कार्ड सोबत घेऊन यावे, अशी अट ठेवली आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडच्या अमृत हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी चक्क एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. भोजने यांनी ‘मनोज’ नावाच्या व्यक्तीला त्याने आधार कार्ड दाखवून २३ ऑक्टोबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत मोफत जेवण दिले जात होते. त्यात वाढ करून येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत मोफत जेवण दिले जाणार आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम