दिनेश कार्तिक घेणार निवृत्ती ? पोस्ट व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ नोव्हेबर २०२२ । टीम इंडियाचा खेळाडू दिनेश कार्तिकने एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे. दिनेश कार्तिकची बेस्ट फिनिशर अशी ओळख आहे. त्यामुळे टीम इंडियाला अनेकदा त्याने अंतिम टप्प्यात सामना जिंकून दिला आहे. बांगलादेशविरुद्ध शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला सहा धावांची गरज असताना षटकार मारला होता. त्याची ती खेळी अद्याप चाहत्यांच्या लक्षात आहे. विश्वचषक स्पर्धेत दिनेश कार्तिकला संधी मिळाली, परंतु त्याला चांगली खेळी करता आली नाही. टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर खेळाडूंनी इमोशनल पोस्ट शेअर केल्या होत्या.

टीम इंडियाचा खेळाडू दिनेश कार्तिकने एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामुळे तो निवृत्त होणार असल्याची सोशल मीडियावर चाहत्यांची चर्चा आहे. कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये अनेक फोटो आहेत, खेळाडू आणि फॅमिली असा तो व्हिडीओ आहे. दिनेश कार्तिकचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून तो निवृत्त होणार असल्याची चर्चा आहे.

दिनेश कार्तिकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये “भारतासाठी T20 विश्वचषक खेळण्यासाठी मी कठोर परिश्रम घेतले होते. कारण टीम इंडियासाठी हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद होते. आम्हाला विश्वचषक स्पर्धेत अपयश आहे. परंतु यामुळे माझे आयुष्य खूप क्रिकेटच्या आठवणींनी भरले आहे. माझ्या सर्व सहकारी खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, मित्रांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या चाहत्यांचे आभार” असं लिहिलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम