पुढच्या दोन महिन्यांत त्यांच्या पत्रिकेत सत्तायोग नाही ; राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ नोव्हेबर २०२२ । राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चिखलफेक केल्यामुळे विद्यमान सरकारविरोधात प्रचंड संतापाची लाट आहे. यावरील लक्ष विचलित करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पुढे करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं आहे. भाजपचे मुख्यमंत्री भाजपच्याच उपमुख्यमंत्र्यांविरोधात अशी भाषा करणं शक्य आहे का? ही सगळी स्क्रिप्ट आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मलाही भविष्य कळतं, पुढच्या दोन महिन्यांत त्यांच्या पत्रिकेत सत्तायोग नाही, असा टोलाही राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रावर हल्ला केलाय, मी याला युद्ध म्हणतो, दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सुरु केलाय, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांवर चिखलफेक केली.

त्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठीच बोम्मईंना पुढे केलंय, लोकांनी छत्रपतींचा अपमान विसरावा यासाठीच हे चाललंय, असा दावा खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. उत्तर प्रदेश, गुजरात इथं असं पाहायला मिळतं का? यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर, किंवा गुजरातच्या सीएमनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर कधी हल्ला केलाय का? हा अत्यंत शिस्त पाळणारा पक्ष आहे. हे सारं नियोजितपणे सुरु आहे, हे सगळं स्क्रिप्टेड आहे, राज्यापालांनी मराठी माणसाचा अपमान केला, गुजराती, मारवाडी मुद्यावरून तो मागे टाकायला मला अटक केली, असं राऊत म्हणाले.

तुम्ही कितीही कारस्थानं केलीत तरी राज्याची जनता विसरणार नाही महाराष्ट्राची एक इंच भूमीही जाऊ देणार नाही. सरकार दुबळंय, पण शिवसेना नाही, टाका तुरूंगात आम्ही भित नाही. राज्याचा या खोके सरकारवर विश्वास नाही यांना खोके दिले की सारं विसरतात. मात्र उद्धव ठाकरेंनी याविरोधात आता रणशिंग फुंकलंय आणि हा लढा फार मोठ्या स्तरापर्यंत जाणार आहे, असंही संजय राऊत यांनी निक्षून सांगितलं. गुवाहाटीला जाऊदेत किंवा लंकेत ४० आमदारांचे लोकांमधून नामोनिशाण नाहीसे झाले आहे. दोन महिन्यांनंतर त्यांच्या कुंडलीत सत्ता योग नाही मलाही कुंडली बघता येते, असा टोलाही त्यांनी लगावला. ज्यांना तंत्रमंत्र करायचेत, भविष्य पाहायचेत त्यांनी पाहून घ्या त्यांच्या स्वत:वर विश्वास नाही, हे स्पष्ट होतं, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम