दिग्दर्शक मंजुळेची मोठी घोषणा ; या पैलवानावर बनविणार चित्रपट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ फेब्रुवारी २०२३ । जगभरात सैराट चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांनी आता एक नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागराज मंजुळे मोठ्या चर्चेत आले आहे.

कोल्हापुरातील कुस्तीच्या मैदानात असतांना मंजुळे यांनी सांगतिले कि, पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. आता चाहत्यांना त्याचबरोबर कुस्तीप्रेमींना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय नागराज मंजुळे यांनी घेतला आहे.

महाशिवरात्री यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाड मध्ये भव्य निकाली कुस्तींच्या जंगी मैदानात नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती. याचवेळी त्यांनी कुस्तीच्या मैदानातून खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. याआधी आमिर खानचा दंगल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातून गीता आणि बबीता फोगाट यांच्या कुस्तीचा प्रवास दाखवण्यात आला होता. आता संपूर्ण जगाला खाशाबा जाधव यांच्या कुस्ती विषयी जाणून घेण्याची गरज असल्याचे मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.

या चित्रपटाबाबत बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, ‘खाशाबा जाधव हे जागतिक कीर्तीचे आणि दर्जेदार पैलवान होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा नेहमीच मनात होती. आता त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. माझ्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. लवकरच या संदर्भातील संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. या सिनेमाचा शूटिंग ही कोल्हापुरात होण्याची शक्यता आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तो काळ अनुभवायला मिळणार हे मात्र नक्की’. नागराज मंजुळे यांच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास येत्या 7 एप्रिलला त्यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम